Wednesday, 10 December 2014

काडतूससाठी पाश्चीमात्यांचे लक्ष्य : भारतीय गाय

वेद वाक्य आहे ‘गाव उपवताक्तं महीयस्य रसुदा। उमा कर्णा हिरण्यया॥’ ऋ.वे. ८-७२-१२ अर्थात जेथील गाई पुष्ट व सुधृढ असतात तेथीलच भूमी जलमय यज्ञभूमी असते व तेथील लोक सुवर्णालंकारानी आभूषित असतात (तिथे उपासमारीमुळे आत्महत्या केल्या जात नाहीत)अथर्ववेदात पुढे वर्णन आहे ‘इन्द्रेण दत्ता प्रथमा शतौदना’अर्थात त्या गाई ज्या शंभर माणसांचे भरण पोषण करतात.वर्तमान भारतात आत्ता ‘शतौदना’ गाईचा विसर पडला आहे. लोक विसरले आहेत की, प्राचीन काळात भारताच्या समृद्धीचा मूळ आधार इकडील गाई हाच होता. मेकोले च्या शिक्षण पद्धतीने आमच्याकडील शिक्षित वर्गाला असा विश्वास दिला की, आमच्या देशाचे मागासलेपण आणि दरिद्रता यांचे प्रमुख कारण आमच्या प्राचीन परंपरा आणि त्यातील आस्था हेच आहे. जर का देशाला उन्नत प्रगतीशील बनवायचे असेल तर, पाश्चिमात्य ज्ञान आणि तिकडील राहणीमान येथे कार्यन्वित करावे लागेल असा त्यांचा द्धढ विश्वास आहे. सर्व क्षेत्रात सुधारsणा घडवून आणण्यासाठी आमच्याकडील तथाकथित विद्वान पाश्चिमात्य देशात जाण्याच्या ‘संधी’ ला आपल्या जीवनाचे लक्ष्य मानू लागले
आहेत.पूर्ण देशाला या पाश्चिमात्य रूपरंगात बदलण्याच्या या प्रयत्नात आमची गोमाता कशी बरी वंचित राहू शकली असती? आमच्या नीती निर्धारकानी केवळ दुधाच्या मात्रेला गोमातेच्या उपयोगीतेचे मापदंड लावले. भारतीय संस्कृतीचा याहून तो मोठा अपमान काय असू शकतो?
आम्ही आमच्या कमकुवत गोष्टी सुधारण्याऐवजी गोमातेलाच दूषण दिले. इतिहास साक्षी आहे की, भारतात जोपर्यंत गाईला मातेप्रमाणे सन्मान दिला गेला तिच्या राहण्याची, आहार-विहाराची उत्तम व्यवस्था केली गेली तोपर्यंत देशात कधीच दुधाचा अभाव निर्माण झाला नाही.दूध उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही आमच्या गोमातेचे कृत्रिम गर्भाधान करण्याचा मार्ग अवलंबिला. पाश्चिमात्यांची नक्कल करण्याआधी आम्ही हे विसरून गेलो की, तेथे गाईना दुधाबरोबरच मांसासाठीही पाळण्यात येते. तेथे कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दूध आणि मांस उत्पादनासाठी कृत्रिम गर्भाधान करण्याला सर्वात उत्कृष्ट उपाय मानण्यात आले आहे. वर्ष १९३१ मध्ये रशियात सर्वात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कृत्रिम गर्भाधानाची योजना बनविली गेली. आज साधारणतः सर्व पाश्चात्य देशात कृत्रिम गर्भाधानाची पध्दत आहे. कृत्रिम गर्भाधारणेसाठी  बैलाचे वीर्य कृत्रिम योनीमध्ये स्खलित करून एकत्रित करण्यात येते. असे प्रत्येक दिवशी दोन तीन वेळा केले जाते. प्रत्येक स्खलनात सात ते आठ मिलीलीटर तरल पदार्थ मिळतो ज्यामध्ये पाचशे करोड पर्यंत शुक्राणू सण्याची संभावना असते. स्वस्थ शुक्राणूची संख्या, स्खलनाची पुनरावृत्ती ही स्वास्थ्य, आहार, वय इ. वर अवलंबून असते. कृत्रिम रूपातील या विर्याला पैनिसिलीन सारख्या रोगनाशक औषधांच्या बरोबर व मिठाच्या पाण्याबरोबर एकत्रित करून शंभर ते दोनशे पटीने वाढवून त्याचा विस्तार केला जातो. अश्याप्रकारे एका स्खलनाद्वारे साधारणतः दोनशे पर्यंत गर्भाधान लसी बनविल्या जातात. याच लसींचा उपयोग कृत्रिम गर्भाधान करण्यासाठी केला जातो.भारतीय संदर्भात गाईंचे कृत्रिम गर्भाधान केवळ अनैतिकच नाही तर अव्यावहारिकही आहे. सरकारी संस्थानात चारा घोटाळा, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा या सामान्य गोष्टी आहेत. त्यामुळे सरकारी संस्थानातील उत्पादित लसी अधिकतर शुक्राणू शून्य मिठाच्या पाण्यातील द्रावणात राहतात. आकड्यांच्या या खेळात प्रत्येक सरकारी संस्थान निर्धारित लसींचे उत्पादन मात्र दाखविते जरी त्या लसी निरुपयोगी असल्या तरीही. या लसीना नायट्रोजन द्रावणात शीतकपाटात ४०-५० अंश सेल्सिअस उष्मांकाच्या खाली थंड केले जाते. लसी बनविण्यापासून ते गर्भाधान केंद्रापर्यंत केव्हा, कुठे आणि किती वीज, नायट्रोजन द्रावणाची उपलब्धता राहिली आणि किती शुक्राणू जिवंत राहिले हा एक संदिग्ध विषयच राहतो. शासन तंत्राच्या या सहकार्याने सरकारी संस्थानात शुक्राणू मेलेल्या लसीच अधिकतर आढळून येतात. कृत्रिम गर्भाधान करण्यासाठी कुशल व संवेदनशील कर्मचार्यांची देखील आवश्यकता असते. सरकारी तंत्रात ही देखील एक जटील समस्या आहे. आणि ग्रामीण क्षेत्रात देखील  कृत्रिम गर्भाधान योजनेसाठी याच समस्या आहेत. एका गाईचा ऋतुकाळ हा त्या गाईच्या जातीचा प्रकार, तिचा आहार,स्वास्थ्य, तिची ठेवण यांवर अवलंबून असते. देशी गाय एक ते दोन दिवस गरम असते. अधिक दुध देणाऱ्या संकरित गाईचा ऋतुकाळ हा काही तासांपुरताच मर्यादित असतो. गाय केव्हा गरम आहे याचा निर्णय घेणे हे निसर्ग नियमानुसार एका बैलाचे काम आहे. मनुष्य गोपालक केवळ गाईच्या ऋतुकाळाचा अंदाज लावू शकतो. देशी गाईमध्ये एक दोन दिवसांच्या वेळेमुळे एवढी कठीण परिस्थिती येत नाही जेवढी जास्त दुध देणाऱ्या संकरित गाईमुळे जी केवळ काही तासच गरम राहते. एवढ्या कमी वेळात कृत्रिम गर्भाधान व्यवस्था उपलब्ध करणे सामान्यपणे कठीण होते.पाश्चात्य देशात पन्नास टक्के पर्यंत कृत्रिम गर्भाधान सफल मानण्यात येते. परंतु येथे असे चित्र दिसते की, ज्या गाईंचे कृत्रिम गर्भाधान करण्यात आले त्या व्यायल्यानंतर (वासरे झाल्यानंतर) कृत्रिम गर्भाधानाची सफलता कमी होत जाते. त्यामुळे अधिकतर दोन-तीन वासरे झाल्यानंतर तेथे गाईना मांसासाठी मारले जाते. भारतात गाईच्या ऋतुमती होण्याच्या योग्य वेळेच्या ज्ञानाचा अभाव, सहकाऱ्यामधील प्रामाणिकतेचा अभाव, विजेची अव्यवस्था, कुशल गर्भधान करणार्यांचा अभाव इ. नुसार राष्ट्रीय योजना आयोगाच्या आकड्यानुसार ३० टक्के कृत्रिम गर्भाधान सफल होतात. परंतु वास्तव हे आहे की, भारतात कृत्रिम गर्भाधानाची टक्केवारी २० टक्के पेक्षा जास्त नाही. कृत्रिम गर्भाधानाचे जेवढे अधिक प्रयत्न केले जातात तेवढे गाईमध्ये वांझपणा येण्याचा संभव अधिक असतो.
दूध न देणाऱ्या गाईसाठी चारा उपलब्ध करणे हे शेतकर्यांसाठी आर्थिक ओझे बनते. सरकारी संस्थानातील उत्पादित गर्भाधान लसी कमी विश्वासार्ह आढळल्याने  विदेशातून लसी आयात करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. ज्यामुळे विदेशातील पशुंचे गंभीर आनुवंशिक आजार येथे पसरण्याचा धोका वाढतो. जास्त धन कमावण्याच्या लालसेपोटी असेही पाहण्यात आले आहे की, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विदेशात निरुपयोगी
झालेल्या लसी ज्या रद्द म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत त्याही येथे आयात केल्या जातात. हे सर्व चित्र पाहून कृत्रिम गर्भाधानाची जबाबदारी वेगळ्या क्षेत्राला देण्याचा विचार केला जात आहे. परंतु असे झाले तरीही या स्थितीत विशेष सुधारणा होणार नाही. कृत्रिम गर्भाधान केवळ अप्रभावी व नुकसानकारकच नाही तर अतिशय खर्चीकही आहे. सरकारी नीतीनुसार ग्रामीण क्षेत्रात जेथे १००० गाई आहेत तेथे एक कृत्रिम गर्भाधान केंद्र उभारण्याची योजना आहे. प्रत्येक केंद्रात एका प्रशिक्षित कर्मचार्यासाठी राहण्यासाठी घर, प्रवासासाठी
मोटार सायकल, गर्भाधान लसींच्या साठवणीकरिता शीतकपाट, लसी लावण्यासाठीचे यंत्र व इतर अनेक वस्तू यांसाठी जवळजवळ वार्षिक २ लाख रुपये एवढा खर्च येतो. जवळील संस्थानाकडून वा व्यक्तींकडून चालू असलेल्या या केंद्रात हा पैसा सरकारद्वारे देण्याची व्यवस्था होत आहे. एका केंद्रातील कर्मचारी मोटार सायकलवरून भांड्यातील नायट्रोजन द्रावणातील गर्भाधान लसी गावातील रहिवाश्यांच्या घरी उपलब्ध
करून देतो. वर्षाला साधारणतः २५० दिवस काम करून तो ५०० गाईंचे कृत्रिम गर्भाधान करण्याचा प्रयत्न करतो. ३० टक्के गर्भाधानची सफलता संतोषजनक मानली जाते. म्हणजे ५०० तील केवळ १५० गाई गर्भवती राहतात. गोष्ट केवळ एवढ्यावरच संपत नाही तर कृत्रिम गर्भाधानातून जन्म घेणारे साधारणतः १५ ते २० टक्के वासरे लगेचच मरण पावतात. अश्या प्रकारे २ लाख प्रतिवर्ष खर्चातून केवळ शंभर वासरेच जगतात. ३० टक्के सफलतेच्या परिणामस्वरूप प्रत्येक गाईचा हा मधील काळ दोन ते तीन महिन्याने वाढतो. गरीब ग्रामवासियांवर आणखीन एक ओझे वाढते. यानंतर ज्या गाईचे प्रत्येक वेळी, प्रत्येक वासराला जन्म देण्यासाठी चार पाच वेळा कृत्रिम गर्भाधान केले जाते तिचे शरीर नंतर शिथिल होते आणि ती तीन ते चार वासरांपेक्षा अधिक वासरांना जन्म देण्यासाठी सक्षम राहत नाही. त्यानंतर अधिकतर गाईना कसायांकडे विकले जाते किंवा रस्त्यावर सोडण्यात येते जेथे त्यांचा असमयी मृत्यू होतो. कृत्रिम गर्भाधानाची ही अव्यावहारिक व अनैतिक व्यवस्था सोडून जर का सरकारने नैसर्गिकरित्या गर्भाधानाची व्यवस्था केली तर, या स्थितीत व्यापक प्रमाणात सुधारणा होवू शकते. एका बैलापासून वर्षाला पन्नास ते सत्तर वासरे उत्पन्न होवू शकतात. एका बैलाच्या व्यवस्थित पालनपोषणासाठी तीस ते चाळीस हजार रुपये एवढा खर्च येतो. दोन लाख रुपये इतक्या खर्चात पाच ते सहा बैलापासून ३५० ते ४०० स्वस्थ वासरे उपलब्ध होवू शकतात. गाईमध्ये देखील वांझपणा येणार नाही व व्यवस्थित पालनपोषण केल्यानंतर प्रत्येक गाय सहजपणे आठ ते दहा वासरांना जन्म देवू शकते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १००० भारतीयांमागे ७०० गाई होत्या ज्यांची घट होवून आत्ता केवळ
१०० राहिलेल्या आहेत. जर का असेच चालू राहिले तर, आम्हाला चहा पिण्यासाठी देखील विदेशातील दूध आयात करावे लागेल जसे बांगलादेश करीत आहे आणि पाकिस्तानही त्याच मार्गावर आहे. हे सर्व पाश्चात्य डेअरी उद्योगांच्या सुनियोजित योजनेप्रमाणे चालू आहे.यासाठी आमच्या शासकवर्गाचा अदूरदर्शीपणा व आमच्या धार्मिक गुरूंची उदासीनता कारणीभूत आहे. आज आवश्यकता आहे ती, देशातील प्रत्येक गोशाळेने देशाच्या कानाकोपर्यातील शेतकऱ्यांस भारतीय जातीचा स्वस्थ बैल उपलब्ध करण्याची.प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक मंदिरात एका स्वस्थ गायी-बैलाचे संगोपन करण्याची आपली जबाबदारी आहे व ते आपल्या र्माचार्यांची व गोशाळा चालवणाऱ्यांचे ध्येय असायला हवे. शेतकर्यांसाठी उन्नत पशुपालन व जैविक शेती यांच्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करणे सक्तीचे करायला हवे. जर का असे झाले तरच शेतकर्यांना आत्महत्या करावी लागणार नाही. कारण गाव वाचले नाही तर ‘शाइनिंग इंडिया’ ही वाचणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्यावर गुलामीची वेळ येईल.

सुबोध कुमार
(लेखक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत आणि महर्षी दयानंद गोसंवर्धन केंद्र, पटपडगंज, दिल्लीतील प्रबंधनात सक्रिय रूपाने कार्यरत आहेत)

गोवंशाची वैज्ञानिक व्यापारिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्व

गाईच्या दुधाशी भले कोण परिचित नाही, त्याचे महत्त्व पाहून त्याला सर्वोत्तम आहाराचा दर्जा दिला गेला आणि त्याची तुलना अमृताशी केली गेली. गाईच्या दूधात अशी अनेक विशेषता आहे जी इतर कोणत्याही अन्य प्राण्याच्या दूधात नाही. त्यात सोन्याचा अंश असतो की ज्यामुळेच त्याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो.  केवळ गाईच्या दुधातच “अ” जीवनसत्त्व आढळते आणि आपल्या विशेष गुणधर्मामुळे ते शरीरातील विषारी घटकांचा नायनाट करते तसेच, कर्करोगाच्या पेशींनाही समाप्त करते. गाईच्या तुपाची यज्ञात आहुती दिल्याने वातावरणातील जीवजंतू नष्ट होतात. गाईचे गोबर (शेण) जाळल्यामुळे एका परिसरातील तापमान कधी विशिष्ट तापमानाच्या सीमेवर जात नाही. भोजनातील पोषक तत्व ही समाप्त होत नाहीत आणि धुरामुळे हवेतील विषाणूचा नाश होतो. गाईच्या शेणापासून बनविलेल्या खतामध्ये nitrogen 0 .5-1 .5 % ,phosphorous 0 .5 -0 .9 % आणि potassium 1 .2 -1 .4 % असते जे रासायनिक खतांसमान आहे आणि जे पिकावर विषारी प्रभाव टाकीत नाही. हे प्रभावशाली प्रदूषण नियंत्रक आहे. गाईच्या शेणामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून ही बचाव होवू शकतो. गोबर पिरामीड मुळे भरपूर मोठ्या प्रमाणात सौर उर्जेचे अवशोषण संभव आहे.तलावात गाईचे शेण टाकल्याने पाण्याचा आम्ल प्रभाव कमी होतो. शेणाचा शिडकावा केल्याने कचऱ्यातील दुर्गंध नाहीसा होतो. लाखो वर्षांपासून शेणाचे खत वापरल्याने जमिनीची सुपीकता संपली नाही परंतु, आत्ता ६० ते ७० वर्षात रासायनिक खतांच्या प्रयोगामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. आजही हिरोशिमा नागासाकी येथील रहिवासी परमाणू किरणांपासून सुरक्षेसाठी गोरस पाण्यात भिजविलेले पांघरूण वापरतात.गोमुत्रामध्ये कडुलिंबाच्या पानांचा रस टाकून एक अतिशय प्रभावी हानीरहित जैव कीटकनाशक तयार होते जे झाडांची वाढ, कीटनियंत्रक व कीटनाशकाचे काम करते. गोमूत्र पर्यावरणाची पूर्ण शृंखला शुद्ध करण्याचे काम करते.गोमुत्राचा अर्क फ्ल्यू, गाठी, रासायनिक कुप्रभाव, लेप्रसी, स्तन कर्करोग, हेपीटीटीस, अल्सर, हृदयरोग, गैस, अस्थमा यांसारख्या रोगांची वाढ रोकण्यास व नष्ट करण्याचे काम करते. गोमूत्र हे केसांसाठीही उत्तम कंडीशनरचे काम करते. प्रत्येक वर्षी पशुधनामुळे ७० लाख पेट्रोलियम ची बचत होते. ६० अब्ज रुपयांचे दूध प्राप्त होते, ३० अब्ज रुपयांचे जैविक खत प्राप्त होते, २० कोटी रुपयांचा बायोगैस प्राप्त होतो. हे आकडे स्वतःच दर्शवतात की, गोमातेचे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धीत किती महत्त्वाचे स्थान आहे. “आठ ऐश्वर्य घेवून लक्ष्मी गाईमध्ये निवास करते” या सांगण्याचा गुढार्थ राष्ट्रलक्ष्मी कडे संकेत करतो जे आपण वरील आकड्यांवरून पाहिले मग असे आहे तर, आपली ही जबाबदारी नाही का बनत की, आपण पुन्हा गोमातेचे ते वंदनीय स्वरूप जनमानसात प्रस्थापित करू जेणेकरून आपला भारत देशात पुन्हा सोन्याचा धूर निघू शकेल.“कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णता गोवंशावर आधारित आहे. जे लोक यांत्रिकीकरणाची शेती व तथाकथित वैज्ञानिक संसाधनाची स्वप्ने पाहतात ते अवास्तविक संसारात राहतात” - लोकनायक जयप्रकाश नारायण

आपल्या देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल

“मी गाईची पूजा करतो. संपूर्ण समाजाने जरी तिच्या पूजेला विरोध केला तरीही मी गाईला पूजेन. गाय जन्मदात्या आईहूनही थोर आहे. आमचे असे मानणे आहे की, ती लाखो व्यक्तींची माता आहे.” - महात्मा गांधी

गोमातेमध्ये ३३ करोड देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे गोमाता आमच्यासाठी पूजनीय आहे. परंतु या धार्मिक आधारावर गोमातेस तिचे योग्य स्थान मिळाले आहे? नाही. उलट आज अशी वेळ आहे की, आजच्या (तथाकथित) वैज्ञानिक व व्यापारीकरणाच्या युगात या गोष्टीवर विचार केला गेला तर कदाचित तिचे हे मानसपुत्र स्वार्थ भावाने  का होईना परंतु तिच्या हत्या करण्याच्या पापातून तरी वाचू शकतील.संपूर्ण प्राणीजगतात गाईचे एक वेगळे आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे स्थान ज्ञान व विज्ञान संमत आहे, ज्ञान व विज्ञान यांच्या नंतर अध्यात्माचा तर विषय येतोच. अश्या प्रकारे ज्ञान, विज्ञान व अध्यात्म या तीन समान रेषांचे सम्मीलन होवून जो त्रिभुज बनतो त्यास गाय असे म्हणतात. विद्वानांनी गायीला साक्षात पृथ्वी स्वरूपा म्हंटलय. या जगताचा भार जी सांभाळते आणि जी विश्वात संपूर्ण गुणांची खाण आहे तिचेच नाव गाय आहे.
आपल्या पूर्वजांनी हे सत्य जाणले होते आणि गोसेवेस आपला धर्म बनविला होता की, ज्याच्या फलस्वरूपच आपला देश “सोन्याचा धूर देणारा” असा बनला होता आणि म्हंटले गेले होते “सर्वे देवा स्थिता देहे, सर्व देवमयी हि गौ” परंतु आपल्याला याचा विसर पडला. ही तर भारताच्या अधःपतनाची पराकाष्टा आहे की,  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वंदनीय अश्या आमच्या गोमातेचा गोमांस व्यापार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. गोमांसाचा आंतरिक उपयोग वाढतच चाललेला आहे.  बीफ खाणे म्हणजे आजच्या आधुनिक जगाची ओळख झालेली आहे. क्त्त्लखान्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे, दररोज नवनवीन  कत्तलखाने उघडले जात आहेत. असे वाटते आहे की, स्वतःकलीयुगानेच गोवंश विनाश करण्याचा प्रण घेतला आहे. इंग्रजांनी गोचर भूमी हडपण्यासाठी जी धूर्तनीती वापरली आम्ही आजही त्यातच अडकून पडलो आहोत. आधुनिक अर्थशास्त्रानेही हिंन्दुस्थानातील गोवंश विनाशच्या बाबतीत आपले विरोधी मत दर्शवून आणखीनच चालना दिली. डॉक्टर राव, मुखर्जी, नानालती आणि अंजारिया यांच्या विचारांचा प्रसार केला गेला ज्यांनी म्हंटले की, गोवंश हे भारतावर ओझे आहे.“७०% भारतीय गाई दुध देत नाहीत. शेतीसाठी बैल उपयुक्त नाहीत” जे पूर्णपणे असत्य आहे. तर भारतीय अर्थशास्त्रज्ञ मसलन डॉक्टर राईट यांच्या अनुसार १९४० च्या दशकातील रुपयाच्या अनुसार फक्त गाय आणि बैल यांपासून मिळणारे दूध, दूधाचे पदार्थ, हड्डी तसेच चामडे खते यांच्या माध्यमातून एक हजार दहा करोड एवढ्या किमतीची मिळकत होते. ही तर एक विचारपूर्वक केलेली धूर्तनीती आहे जी भारतीय गोवंशाच्या विनाशासाठी तयार केली गेली आहे. मसलन डॉक्टर राईट यांच्या अनुसार इकडील शेतकऱ्यांना ते म्हणतात इकडील गाई फक्त ६०० पौंड दूध देतात तर विदेशी संकरित गाई ५००० पौंड दूध देतात.शेवटी एक गोष्ट तर निश्चित आहे की, “आधुनिक तसेच इंग्रज विद्वानांनी खूपच सुनियोजित पद्ध्तीने भारतीय गोवंशाला क्त्त्लखान्यांकडे ढकलण्याचा प्रयत्न केला” आज स्थिती अशी आहे की, अत्यंत उपयोगी आणि ऐन उमेदीतील आमचा पवित्र गोवंश क्त्त्लखान्यांकडे पाठविला जात आहे. आचार्य विनोबा भावे यांनी तर गोवंशाच्या प्राणाची रक्षा करण्यासाठी स्वतःचे प्राण त्यागले परंतु खेदाची गोष्ट अशी की, त्यांच्या बलिदानाचा सर्वांस विसर पडला.

गोक्रांती : या गाईवर प्रेम करूया

सर्व गोभक्तांचे या पेज वर हार्दिक अभिनंदन आहे. या पेज चा एकमात्र उद्देश आहे गोमातेचे दुध-दही, तूप, लोणी तसेच गोमुत्र व गोमय आदींपासून निर्मित केलेल्या उत्पादनांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून गोमातेचे रक्षण करण्याच्या हेतूसाठी प्रत्येक सनातन्याच्या मनात गोमातेबद्दल श्रद्धा,आस्था व गोरक्षण हेतू वैचारिक क्रांतीचे प्रतिपादन करणे. गोमातेमुळे आपण सर्वच स्वस्थ निरोगी व दीर्घायू जीवन व्यतीत करू शकतो. आज गोमातेवर संकट आले आहे. आज फक्त भारतातील कत्तलखान्यात प्रत्येक वर्षी करोडोंच्या संख्येने गोहत्या होत आहे. असेही ऐकण्यात आले आहे की,काही कत्तलखान्यात गोमातेवर आधी उकळते पाणी ओतले जाते जेणेकरून तिचे चामडे  नरम होऊ शकेल. त्यानंतर जिवंतपणीच त्यांचे चामडे  उतरविले
जाते जेणेकरून चामडे  जास्त नरम होईल व बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळेल. चामडे काढल्यानंतर त्यांना फार निर्दयतेने कापले जाते. आज आपला पवित्र गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.एक खरा सनातनी असण्याच्या नाते आपण गोमातेच्या रक्षण हेतू करिता कमीत कमीत एवढा संकल्प तर निश्चितपणे करू शकतो :
1. कोणत्याही प्रकारची चामड्याची वस्तू वापरात आणणार नाही.
2. प्रत्येक दिवशी भोजन करण्यापूर्वी कमीत कमी एक पोळी गोमातेसाठी अवश्य काढेन.
3. केवळ गोमातेचे दुध आणि गोमातेच्या दुधाने निर्मित केलेले पदार्थच वापरेन.
4. प्लास्टिकच्या पिशव्या कधीही सार्वजनिक कचराकुंडीत टाकणार नाही कारण, आवश्यकतेनुसार चारा न मिळाल्याने काही गोमाता आपली भूक भागविण्याकरीता सार्वजनिक कचराकुंडीकडे जातात आणि तिकडच्या खाद्य-वस्तूंसोबत तिच्या पोटात प्लास्टिक जाते ज्यामुळे त्यांना अत्याधिक त्रास सहन करावा लागतो.
5. जास्तीत जास्त झाडे लावू जेणेकरून वातावरण शुद्ध होईल आणि त्याचबरोबर गोमातेसाठी पर्याप्त चारा सुलभतेने उपलब्ध होईल. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे दैवी कार्य संभव आहे. तरी तुम्ही स्वतः या कार्यासाठी तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे तसेच तुमच्या सर्व आप्तस्वकीयांस व मित्रपरिवारास प्रेरित करून सहभागी करावे.